राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा; पवारांचं एका वाक्यात उत्तर, मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण

पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तारखेबाबत निर्णय कळवण्यात आलेला नाही. मात्र, बारामतीत तयारी सुरू करण्यात आली आहे.

News Photo   2026 07 28T150106.037

राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा; पवारांचं एका वाक्यात उत्तर, मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीएसोबत जाणार (NDA) अशी चर्चा असतानाच शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्यानंतर सुप्रिया सुळे अमित शहांना भेटल्या, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरेही शहा यांना भेटले. या गळ्या भेटीगाठींवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. अशातच आता शरद पवार यांनी प्रधान नरेंद्र मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण दिल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने आता सर्वत्र तर्क वितर्क सुरू झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यासाठी हे आमंत्रण देण्यात आलं आहे. विद्या प्रतिष्ठान मधील नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा हा पुतळ्याचं उभारण्यात येत आहे. आज शरद पवारांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. २ ऑक्टोबरला किंवा १६ ऑक्टोबरला (अद्याप तारीख निश्चित नाही) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याचा शरद पवारांचा मानस आहे.

सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली शहांची भेट; राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्यावर खलबत?

पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तारखेबाबत निर्णय कळवण्यात आलेला नाही. मात्र नरेंद्र मोदी येणार आहेत हे मानून बारामतीत तयारी सुरू करण्यात आली आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये 9 फुटी बुद्धांचा पुतळा नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या 13 महामानवांची पेंटींग्ज असणार आहेत.

2 ऑक्टोबरला किंवा 12 ऑक्टोबरला (अद्याप तारीख निश्चित नाही) महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त या डोमचे अनावरण व्हावं यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. आज झालेल्या विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत नरेंद्र मोदींना बोलवण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार आणि दिल्लीत गेल्यावर प्रत्यक्ष भेटून आमंत्रण देणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

Exit mobile version