28 सप्टेंबरला शरद पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार परिस्थितीचा आढावा

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Untitled Design   2026 09 21T132001.575

Untitled Design 2026 09 21T132001.575

Sharad Pawar tours drought-affected areas : राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची कमतरता जाणवत असून शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी काळात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना कारण्यासाटःई आवश्यक उपाययोजनांची तयारी देखील प्रशासनाकडून सुरू आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 28 सप्टेंबर रोजी शरद पवार राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या भागात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. आता प्रत्यक्ष दौऱ्यानंतर पवार सरकारकडे आणखी कोणत्या मागण्या करतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील दुष्काळी भागांचा दौरा सुरू केला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ते राज्य सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे आता शरद पवार स्वतः दुष्काळग्रस्त भागात उतरणार असल्याने या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

हप्ता थकला म्हणून बळजबरीने वाहन जप्त करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून दुष्ककाळाच्या परिस्थितीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर ते दुष्काळाबाबत कोणती निरीक्षणे नोंदवतात, सरकारसमोर कोणत्या मागण्या ठेवतात आणि त्याववर राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे देखील लक्ष असणार आहे. याचदरम्यान 28 सप्टेंबर रोजी मुंबईतील वाय बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

या बैठकीत राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती, शेतकरी व ग्रामीण जनतेसमोर समस्या, बेरोजगारी, पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार, एसआयआर संदर्भातील पक्षाची तयारी, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच पक्षवाढीसाठी पुढील रणनीती अशा प्रमुख विषयांवर चर्चा केली जाणार आहे. एकीकडे राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत असताना दुसरीकडे शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरणार आहेत. त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version