Sharad Pawar : ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतल्या वाय.बी. सेंटरमध्ये उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तीन नेते पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी असून आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात कदाचित काही होईल आणि याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाही. असं म्हणत शरद पवार यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर सूचक भाष्य केलं असल्याची चर्चा रंगली. (sharad pawar uddhav thackeray balasaheb thorat mumbai yb centre together)
शरद पवार म्हणाले?
धुळे या सारख्या संस्थांना आपल्याकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत आपल्याला सरकारशी बोलणं अडचणीचं जात आहे. सध्याच्या स्थितीतून आज किंवा उद्या काही तरी मार्ग निघतील आणि जेव्हा हे घडलं त्यावेळी सरकारला मदत करायला भाग पाडणं अडचणीचं ठरणार नाही, मी, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आम्ही ठरवलं तर महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही.
भिडेंनी पुन्हा गरळ ओकली, गांधीनंतर आता फुले अन साईंबाबांच्या xxx
ज्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात देखील आम्ही त्यांच्या सरकारकडून दोन कामं करुन घेतली होती. संस्थांना मदत करण्याची गरज त्या सरकारच्या काळात पूर्ण केली होती तशीच मदत आज होण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.
या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना दुर्ग भ्रमंती बाबत अतिशय माहिती आहे. ऐतिहसिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल खूप आस्था आहे, ते उत्तम फोटोग्राफर आहेत.”