Pawar Vs Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू. आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेनंतर पवार काका पुतण्याचा निवडणूक आयोगात सामना होणार आहे.(Sharad Pawar Vs Ajit Pawar The match will be held in the Election Commission)
राष्ट्रीय अध्यक्षाबाबत प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचं मी ऐकलं. मात्र, मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कुणी काय नियुक्त्या केल्या, यात तथ्य नाही. दुसरं कुणी स्वत:च्या नावाने विधान केलं असेल किंवा काही बोललं असेल तर ते बोलू शकतात. मात्र, त्यात सत्यता नाही. मीच अध्यक्ष आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. त्यामुळं निवडणूक आयोगात जाण्याचा आमचा विचार आहे. कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे वेळ आल्यावर कळेल. आम्ही नव्यानं पक्षाला उभारी देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी दिला आहे. आम्ही जनतेमध्ये जाणार असून जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्षाचा त्यांच्या पूर्ण विश्वास आहे, असा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संमत करण्यात आला आहे. याशिवाय खासदार प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अन्य 8 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
NCP : “जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच असायचं; बहुतेक वेळा तर…” : पवारांचा नातू पटेलांना भिडला
पत्रकारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावं वाटतं, याविषयी विचारले असता पवार म्हणाले, कोणाला काही व्हावं वाटंत याचं मला काही देणं-घेणं नाही. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी म्हणून स्वत:ची निवड केली आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना पवारांनी भाजपवरही निशाणा साधला. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा सत्तधारी पक्षाकडून वापर होत आहे. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की, 2024 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत, त्यांना लोक दूर करतील. विरोधी पक्षांवविरोधात जे काही कट कारस्थानं करण्यात आलं, त्याची किंमत मोजावी लागेल, असं मत पवारांनी व्यक्त केलं.