मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. कॉंग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर राज्य आणि देशात भाजपकडून आंदोलने केली गेली. तसेच अनेक पक्षांकडूनही कधी सावरकरांच्या मुद्द्याच्या बाजूने तर कधी विरोधात भुमिका घेतल्याचं पाहायला मिळलं. त्यादरम्यान आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02XMGJfq6c9CQQFdrPMyrskGX4TT9Q9XqQk59Ai7QDbQsXjAnWwaV369rewoNr2GX4l&id=100008377242826&sfnsn=wiwspwa&mibextid=RUbZ1f
अभिनेते शरद पोंक्षे यांनी या पोस्टमध्ये म्हटले. त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘मला मुस्लिमांची भीती वाटत नाही. इंग्रजांची भीती वाटत नाही. हिंदुंची भीती वाटते, हिंदुंनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरू केलं आहे.’ तसेच या पोस्टला कॅप्शन देताना शरद पोंक्षे यांनी लिहिलं की, सावरकरांनी किती पूर्वीच हे ओळखलं होतं. याला म्हणतात दूरदृष्टी.
Veer Savarkar : …हा ठाकरे यांच्या सर्वोच्च शरणागतीचा क्षण : शिंदे-फडणवीसांचा आरोप
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व इतर भाषणांमध्ये स्वांतत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हटले होते. सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र माझ्याकडे असल्याचे गांधींना दाखविले होते. त्यावरून उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मालेगाव येथील जाहीर सभेमध्ये ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सुनावले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांची बैठक झाली होती. त्यात या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर सावरकरांबाबत काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आहे.