पुण्यात गुन्हेगारांना तिकिटं दिल्याच्या प्रश्नावर शशिकांत शिंदेंकडून अजितदादांची पाठराखण

Shashikant Shinde यांना पुण्यामध्ये अजित पवारांनी गुन्हेगारांना तिकीटं दिले त्यावर विचारलं असता त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली.

Shashikant Shinde

Shashikant Shinde

Shashikant Shinde on Ajit Pawar gives Tickets to Criminals in Pune PMC : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी 30 डिसेंबर 2025 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये पुण्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिल्याचं समोर आलं आहे. त्यात पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती आहे. त्यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदेंना पश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदेंना पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणजे अजित पवार हे गुन्हेगारांना तिकीटं देत आहेत. असा पश्न विचारला गेला होता. त्यावर शिंदे म्हणाले की, आमचं त्यांचं युती झाली आहे. हा प्रश्न सर्व पक्षांना लागू होतो. फक्त अजित पवार गट याला अपवाद नसून देशआत देखील अनेक गुन्हेगारांना तिकीटं दिले गेले आहेत. याबाबत कायदा -नियम तयार झाले पाहिजे. मी सांगून काही होईल का? लोकशाहीत उमेदवार अर्ज दाखल करण्याची तरतुद आहे. त्यानुसार राजकारणातील गुन्हेगारीकरण थांबले पाहिजे. असं म्हणज एकप्रकारे शिंदेंनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.

पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत जाणार? ‘आघाडी झाली याचा अर्थ…’ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

तसेच ते पुढे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीच्या पक्षांनी आमच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडी मजबूत करू. 29 महापालिका निवडणुकीत आम्ही 6 ठीकाणा स्वबळावर, 11 काँग्रेस सोबत, 11 उद्धव ठाकरे शिवसेना सोबत, 5 मनसे सोबत, 3 NCP अजित पवार, 7 ठिकाणी स्थानिक ठिकाणी आघाडी करतोय. त्यामुळे आम्ही एकत्रित अजेंडा प्रकाशित करू. प्रांत वाद, भाषिक वाद निर्माण होत आहे का? बाहेरच्या राज्यातील नेत्यानं बोलावले जात आहे.

Video : आज 31 डिसेंबर! पुणे-मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरात पोलीस तैनात, दिला कडक इशारा

तर मुंबईमध्ये भाजपमध्ये गेलेल्या राखी जाधवांवर बोलताना शिंदे म्हणाले की, कोणाच्या जाण्याने काय फरक पडत नही त्यांना वाटते आपण bjp कडूनच निवडून येऊ शकतो असं त्यांची मानसिकता झाली याचं कूनकून आम्हाला लागली होती. म्हणून त्यांनी निर्णय घेतला. तसेच कुणालाही अजित पवारांच्या पक्षामध्ये जाण्याचे सांगितले नव्हते.

Exit mobile version