Download App

Sheetal Mhatre Video : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या मित्राला अटक, आतापर्यंत पाच जणांना अटक

  • Written By: Last Updated:

Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणातील आता नवी अपडेट समोर येत आहे. शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.याशिवाय ते मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत.

याशिवाय पोलिसांकडून मातोश्री नावाचे फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

..तर चंद्रकांत पाटलांना पुणे सोडावं लागेल…

दरम्यान शीतल म्हात्रे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर माझा आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. परंतु, हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात येत आहे, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.

व्हायरल व्हिडीओवरून आज विधानसभेतही जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव व भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी हा व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sheetal Mhatre : चित्रा वाघ म्हणाल्या…शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत

एका महिलेने कितीवेळा स्वत:ला सिद्ध करायचे, असे यामिनी जाधव म्हणाल्या आहेत. तसेच या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण आहे ते शोधून त्याला शासन करा, असे आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या आहेत. हा एका महिलेच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. याआधी देखील त्यांच्याविषयी टॉयलेटमध्ये घाणेरडे लिहिण्यात आले होते. याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. मला यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडून उत्तर हवे आहे, असे चौधरी म्हणाल्या आहेत.

Tags

follow us