Sheetal Mhatre : चित्रा वाघ म्हणाल्या…शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत

Sheetal Mhatre : चित्रा वाघ म्हणाल्या…शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत

मुंबई : शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा रॅलीमधील व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला आहे. यामुळे आता राजकारण तापले आहे. आता या वादात भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी उडी मारली आहे. शितलच्या व्हायरल व्हिडीओवरून वाघ म्हणाल्या, हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. म्हणून शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत असे वाघ म्हणाल्या आहेत.

शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. यातच आता शिंदे गटातील नेतेमंडळी तसेच भाजपातील नेतेमंडळी म्हात्रे यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. यातच आज भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यांवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

वाघ म्हणाल्या, राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा प्रकारे त्रास दिला जातो हे तुम्ही आजवर पहिले असेल. मात्र आता विकृतीने कळस गाठला आहे. नुकताच मी एक व्हिडीओ पहिला शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा हा मॉर्फ व्हिडीओ आहे. एखाद्या बाईला तुम्ही थांबवू शकले नाही त्यामुळे तुम्ही तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवता. तिचे विकृत व्हिडीओ बनवून तिची बदनामी केली जाते. हा विषय फक्त शीतल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे हा लढा सर्वानी मिळून लढला पाहिजे.

ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी

उद्धव ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक झाली आहे. मात्र त्यांना हे करण्यास कोणी सांगितले असेल? यांचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे ? हे शोधून काढले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही काय महिला सन्मान करता? तुमचा एखाद्याच्या विचारला विरोध असू शकतो, तसेच तुमचा एखाद्या व्यक्तीला विरोध असू शकतो मात्र यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाणार. माझं मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा, असे आवाहन देखील वाघ यांनी यावेळी केलं आहे.

नॉट रिचेबल मुश्रीफ अखेर घरी परतले; ईडी चौकशीसाठी…

काय आहे प्रकरण? जाणून घ्या
काही दिवसांपूर्वीचशिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ मॉर्फ (video viral) करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा रॅलीतील व्हिडीओ असून फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजवरुन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मानस कुवर (Manas Kuvar) आणि अशोक मिश्रा (Ashok Mishra) या दोघांना अटक केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube