Download App

अंबादास दानवे तुम्ही हे काय बोलले? शीतल म्हात्रेंचा तो व्हिडिओ मी फॉरवर्ड केलायं; तो 32 देशांनी पाहिलायं

  • Written By: Last Updated:

Ambadas Danve On Shital Mhatre Viral Video : शिवसेनेच्या उपनेत्या मॉर्फ व्हिडिओचा मुद्दा सध्या राज्ायात चांगलाच गाजतोय. मात्र, याचवेळी विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी धक्कादायक विधान केले आहे. म्हात्रेंचा हा व्हिडिओ आपण स्वतःदेखील फॉरवर्ड केल्याचा खुलासा दानवेंनी विधानपरिषदेत केला आहे.

म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या

एवढेच नव्हे तर, व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत 32 देशांमध्ये पाहिला गेल्याचं दानवेंनी सांगितले. हा व्हिडिओ 30 लाख लोकांनी पाहिल्याचेही यावेळी दानवेंनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस उगाच दुसऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. त्याऐवजी पोलिसांनी आमदराच्या मुलाच्या फेसबुक पेजचा तपास करावा आणि तो खरा आहे की मॉर्फ केलेला याचा तपास करावा अशी मागणी दानवेंनी केली आहे. दानवेंच्या या विधानावरून आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महिला आयोगाकडून दखल

दरम्यान, म्हात्रेंच्या या व्हिडिओमुळे एकीकडे राजकारण तापलेले असताना या सर्व प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत राज्याच्या गृहविभागाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यात महिला लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचे प्रकार वाढत आहेत. जर लोकप्रतिनिधींबाबत असे प्रकार होत असतील तर, राज्यात महिला सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. महिलांना सायबर सुरक्षा देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई करावी. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी. तसेच सत्य जनतेला सांगावे असेही चाकणकर म्हणाल्या आहेत.

कसब्यातील पराभवानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष बदलाची कुजबूज

यामागे कुणी मास्टर माईंड आहे का?

या सर्व प्रकरणावर बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वसामान्य लोक राजकारण्यांकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय क्षेत्रात असो किंबहुना कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वतःचं चारित्र्य जपणं खूप महत्त्वाचं आहे. एकवेळ राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला अधिक खोलात जायची गरज नाही. परंतु, कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलेले नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले आहेत का? त्यामागे कुणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी झाली पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत.

 

Tags

follow us