कसब्यातील पराभवानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष बदलाची कुजबूज

कसब्यातील पराभवानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष बदलाची कुजबूज

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) भाजपचा दारुण पराभव झाल्याने पुणे भाजपातील (BJP) नेतृत्व बदलाची कुजबूज सुरू झाली आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा 11 हजार 40 मताधिक्याने दणदणीत पराभव केला आहे. यामुळे कसब्यातील पराभवाला जबाबदार कोण ? यावरून भाजपात ”तू तू मै मै” सुरू झाली असून आगामी महापालिका निवडणुकासह इतर निवडणुका सोप्या जाण्यासाठी पुणे शहराध्यक्ष बदलण्यात यावा, अशी मागणी पुणे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने वरिष्ठांकडे केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

ते म्हणाले, शहर भाजपमध्ये हेमंत रासने, मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ, गणेश बिडकर, धीरज घाटे, जगदीश मुळीक यांसारखे नेते पुणे भाजपचे भविष्य आहे. त्यामुळे आता शहरात या सगळ्या नेत्यांना एका दिशेने घेऊन जाणाऱ्या नेत्याकडे शहराचे अध्यक्ष पद देण्यात यावे जेणेकरून पक्षाला पुढच्या निवडणूका जड जाणार नाहीत, अशी मागणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

Uddhav Thackeray : बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दिलासा पण गौरी भिडे सुप्रीम कोर्टात जाणार

दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणूक होण्यापूर्वीच भाजप शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या ऐवजी आमदार सिद्धार्थ शिरोळे किंवा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना अध्यक्ष केले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. शहर भाजपात नेतृत्व बदल केला नाही तर आगामी महानगरपालिका निवडणूक भाजपला अवघड जाऊ शकते. त्यामुळे मुळीकांना खासदारकी द्यावी आणि आमदार शिरोळे यांना शहराध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी गेल्या वर्षीपासूनच जोर धरू लागली आहे. आता कसब्यातील पोट निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पुन्हा एकदा याची चर्चा होत आहे.

पुणे शहराध्यक्ष पदासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, गणेश बिडकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची शहराध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. तर प्रदीप रावत हे देखील या रेसमध्ये आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील पराभवाच आम्ही पोस्टमार्टम केल्याचं म्हंटल आहे. त्यानुसार आम्ही योग्य ती काळजी घ्यायची आहे ती नक्कीच घेऊ, असे म्हणत त्यांनीही एकप्रकारे शहरात नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहेत. आता प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube