Download App

वर्षावर शिंदे-फडणवीस अन् पवारांमध्ये तीन तास खलबतं; खाते वाटपाचा तिढा सुटणार?

Maharashtra Politics : राज्यमंत्रीमंडळाचा आज होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असाताना एक बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पाडली . यामध्ये खाते वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. ( Shinde Fadanvis and Ajit Pawar meeting for three hours at CMs Varsha Bungalow )

जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का; बालेकिल्ल्याला अजितदादांचे खिंडार

दरम्यान अगोदरच शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने शिंदेंचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामध्ये आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली आणि त्यांच्या आमदारांना शपथ देखील देण्यात आली त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पाडली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 17 जुलैपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

काय झालं या बैठकीमध्ये?

सोमवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पाडली. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. ही तीन तास अशी प्रदीर्घ चर्चा झाली. तर अजित पवार यामध्ये केवळ दीड तासच उपस्थित होते. तर अजित पवार येण्याआधी आणि नंतर केवळ शिंदे फडणवीसांनीच चर्चा केली. त्यामुळे आज मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us