छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ
Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोंडींदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच शपथ घेतलेले मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भुजबळांच्या कार्यलयामध्ये फोनच्या माध्यमातून ही धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. ( Cabinet Minister Chhagan Bhujbal Death threat by phone call )
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-वेस्ट इंडिज सामने फ्री बघता येणार
काय आहे प्रकरण?
कॅबिनेट मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. सोमवारी छगन भुजबळ हे नाशिकहून पुण्याला गेले होते. यावेळी त्यांनी सायंकाळचा कार्यकक्रम सुरू असताना त्यांना ही धमकी देण्यात आली.
अजितदादांना ठाकरेंनी दाखवला आरसा, म्हणाले, कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते…
हा फोन भुजबळांच्याच फोनवर करण्यात आला होता. मात्र त्याच्या सहकाऱ्याच्या फोनवर तो डायव्हर्ट केलेला असल्याने त्यांनी तो उचलला त्यावेळी ही धमकी देण्यात आली आहे. या धमकी देणाऱ्याने या फोन कॉलवर सांगितले की, मी सुपारी घेऊन काम करतो. मला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे.
त्यानंतर भुजबळांच्या कार्यालयाकडून तात्काळ यासंदर्भात पुणे आयुक्तालायाकडे ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी हा फोन नंबर कुठू होता. कुणाचा होता याचा शोध लावला. त्यानंतर सोमवारी रात्रीच या धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. तर या धमकी प्रकरणानंतर छगन भुजबळांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर या व्यक्तीने मद्यपान करून ही धमकी दिल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिस काय कारवाई करतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.