अजितदादांना ठाकरेंनी दाखवला आरसा, म्हणाले, कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते…

अजितदादांना ठाकरेंनी दाखवला आरसा, म्हणाले, कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते…

कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या होते, मग अचानक साक्षात्कार कसा झाला? असा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतून भाजप-शिंदे गटासोबत सामिल झालेल्या अजित पवारांवर सडकून टीका केलीय.

…म्हणून आई-वडिलांची शपथ घ्यावी लागते; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे म्हणाले, काल परवापर्यंत जे आपल्यासोबत बसले होते ते आता पलीकडे गेले आहेत. आपल्याकडे असताना मोदींना खूप शिव्या देत होते. मात्र आता त्यांना साक्षात्कार झालाय की जेवढा विकास होतोय तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करतोय. कालपर्यंत तर तुम्ही शिव्या देत होता, मग आज अचानक कसा काय साक्षात्कार झाला? तुमचा विकास होत असेल, पण देशाचा विकास कुठे होतोय? असं उद्धव ठाकरे अजित पवारांचं नाव न घेता म्हणाले आहेत.

“अमोल कोल्हे कायम घोड्यावरच; ते जमिनीवर कधी आलेच नाहीत! फडणवीसांवरील टिकेला विखेंचे प्रत्युत्तर

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल चढविला आहे. आज धुळ्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवाोद्गार काढत विकासपुरुष असं म्हटले होते. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधत समाचार घेतला आहे.

दोनशे रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले, उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांवर निशाणा

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. या सर्व घडामोडी सुरु असतानाच अचानक अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह सत्ताधारी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडल्याचं स्पष्ट झालं. या संपूर्ण घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी अजितदादांबद्दल थेट भाष्य केलं नव्हत. मात्र, पहिल्यांदाच त्यांनी थेट अजित पवारांवर भाष्य केलं आहे. ठाकरेंच्या या टीकेनंतर आता अजित पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube