“अमोल कोल्हे कायम घोड्यावरच; ते जमिनीवर कधी आलेच नाहीत! फडणवीसांवरील टिकेला विखेंचे प्रत्युत्तर

“अमोल कोल्हे कायम घोड्यावरच; ते जमिनीवर कधी आलेच नाहीत! फडणवीसांवरील टिकेला विखेंचे प्रत्युत्तर

Sujay Vikhe Speak On Amol Kolhe : “जे कोणी भाजपला शकुनी मामा म्हणत आहे तेच गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यप्रयोग करत फिरत आहे. कधी अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर ते गेलेत का? ते नेहमी घोड्यावरच असतात, कधी जमिनीवर आलेच नाही,” अशा शब्दात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (BJP MP Sujay Vikhe Patil criticized NCP MP Amol Kolhe on Yeola Rally)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या येवला येथील बोलताना अमोल केल्हे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शकुनी मामा म्हटलं होते. यावर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले, कोल्हे हे मागील तीन वर्षांपासून वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात महाराष्ट्रात फिरत होते. मात्र ते खासदार असूनही कधी कोणत्याही अतिवृष्टीमध्ये फिरकले देखील नाही. ते नेहमीच घोडयावर असतात. बळीराजा संकाटात असताना राज्याला त्यांची आवश्यकता होती तेंव्हा तर कुठे दिसले देखील नाही. ते फक्त वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात घोड्यावर बसलेले दिसतात. बैलगाडा शर्यतीत ही ते घोड्यावरच होते. ते कधी जमिनीवर आलेच नाही, त्यामुळे त्यांना वास्तविकता माहिती नाही.

‘काहीही झालं तरी पार्थ सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही’; रोहित पवारांनी सांगितलं कारण

ते चांगले अभिनेते आहे. ते डायलॉग डिलिव्हरी अतिशय उत्तम करतात. या पलीकडे त्यांच्या भाषणात काहीही नव्हतं. मनोरंजन म्हणून त्यांचे भाषण पाहावं, लवकरच त्यांना कुठला तरी उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत, असा खोचक टोला विखे यांनी नाव न घेता अमोल कोल्हे यांना लगावला आहे.

नाराज बेनकेंची समजूत काढण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्टिव्ह; भुजबळ घरी जाऊन काढणार समजूत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिठाचा खडा टाकण्याचे काम या शकुनीमामाने केले. मिठाच्या खड्याचा आकार टरबुजा सारखा की कमळा सारखा असे म्हणत अमोल कोल्हेंनी खिल्ली उडवली. भाजप देशातील राज्यातून हद्दपार होत आहे. म्हणून महाराष्ट्रात हि खेळी केली आहे. यांनी देशातील जनतेला नऊ वर्षांपूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्यात असल्याचे सांगितले होते. परंतु आज या देशातील सरकारमुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube