‘काहीही झालं तरी पार्थ सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही’; रोहित पवारांनी सांगितलं कारण

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 10T114235.807

 NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही लोक अजितदादांना विलन करण्याचे काम करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गट या दोघांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यानंतर आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतला बाजूला करुन अजित पवारांना विलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ( Rohit Pawar On NCP Political Crisis )

रोहित पवार म्हणाले की, नाशिकमध्ये बॅनरवर फक्त छगन भुजबळांचा फोटो होता. त्या बॅनरवर अजितदादांचा फोटो लावण्यात आला नव्हता असा आरोप, रोहित पवारांनी केला आहे. काल नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी अजितदादांना सहज बाजूला काढलं. त्यांनी पक्ष फुटल्याचं खापर अजितदादांवर फोडलं. ते तसेच भाजपने एक डाव खेळला आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला मराठी अस्मिता जपण्यासाठीचा पक्ष फोडला.

Poster War : अमरावतीत रंगला बॅनर फाड वॉर, ठाकरे-राणा समर्थकांनी फाडले एकमेकांचे पोस्टर

भाजप लोकनेत्यांना जवळ घेतात आणि संपवतात त्यांच्या पक्षात ही तसंच केलंय. लोकमान्यता असलेला नेतृत्व भाजपने संपवलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बारामतीमधून पार्थ पवार हे सुप्रियाताईंच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरही त्यांनी भाष्य केले आहे. भाजपने कितीही ताकद लावली तरी पार्थ पवार सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही.  कुटुंबाच्या विषयात काही झालं तरी अजितदादा वेगळी भूमिका घेणार नाहीत. हे  मी कुटुंब म्हणून सांगतोय, असे रोहित पवार म्हणाले.

भाजपच्या विरोधात देशात वातावरण आहे. त्यावर कोणी बोलू नये अनेक मोठे नेते आपल्यातच गुंतून रहावे यासाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही उत्तर-प्रत्युत्तर देतोय आणि भाजप वेगळं राहतोय, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते एसीमध्ये बसून मजा बघतायत आणि आम्ही आमच्यात भांडतोय. लोकांना माहिती आहे की, कुटुंब-पक्ष कोणी फोडला. लोकं या गोष्टी विसरणार नाही, असेही रोहीत पवार म्हणाले.

NCP Political Crisis: राष्ट्रवादी खरी कोणाची? शरद पवार की, अजित पवार ‘या’ फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय

भाजपसोबत गेलेले आज म्हणत आहे की, आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. मग तुम्ही पदावर असताना विकास केला नाही का, असा प्रश्न सामान्यांना पडतोय. असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube