Download App

मोठी बातमी : राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई :  राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Shinde government’s decision to declare drought in 40 talukas of the state)

यावेळी फडणवीस म्हणाले, राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

Maratha Protest : जाळपोळ करणाऱ्यांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करणार, फडणवीसांचा इशारा

दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली.  यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

Nitesh Rane यांचा जरांगेंना फोन; म्हणाले, आरक्षण मिळत राहिल तुम्ही…

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची जिल्हानिहाय यादी :

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, जालना : जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, बीड : वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लातूर : रेणापूर, धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा, नंदुरबार : नंदुरबार, धुळे : शिंदखेडा, जळगाव : चाळीसगाव, बुलढाणा : बुलढाणा, लोणार, नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे : शिरूर, मुळशी, पौंड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूर : करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, सातारा : वाई, खंडाळा, कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज, सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज.

Tags

follow us