Nitesh Rane यांचा जरांगेंना फोन; म्हणाले, आरक्षण मिळत राहिल तुम्ही…
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच ते म्हणाले की, आरक्षण मिळत राहिलं. हे सगळं तुमचंच श्रेय आहे. फक्त तुम्ही तब्येत सांभाळा बाकी काही नाही.
काय म्हणाले नितेश राणे?
यावेळी नितेश राणे म्हणाले की, नमस्कार, कसं काय? बरी आहे ना तब्येत. तब्येत सांभाळा बाबा तुम्ही. खालावत चालली आहे. काळजी घ्या. बाकी आरक्षण मिळत राहिलं. हे सगळं तुमचंच श्रेय आहे. फक्त तुम्ही तब्येत सांभाळा बाकी काही नाही. काळजी घ्या. ठिक आहे. असं फोनवरील संभाषण मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यामध्ये झालं.
चंद्राबाबू नायडू 52 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नारायण राणेंचा सरसकट आरक्षणाला विरोध…
दरम्यान नितेश राणे यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्या सरसकट मराठा आरक्षणाच्या भूमिकेला विरोध केला आहे. नारायण राणे म्हणाले होते की, सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. कारण कुणबी मराठा आणि शहाण्णव कुळी मराठा यांच्यात फरक आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीची भूमिका चुकीची आहे.
पुढे नारायण राणे असंही म्हणाले होते की, मनोज जरांगे यांना जातिंच्या इतिहासाचा आणि कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी ही सरसकट आरक्षणाची मागणी करू नये. असा सल्ला त्यावेळी नारायण राणे यांनी जरांगेंना दिला होता. मात्र त्यानंतर आता नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली.