Download App

तटकरेंनी रायगड सोडून बोलावं; पालकमंत्री फक्त ‘भरतशेठ’ होणार! गोगावलेंनी थोपटले दंड

Bharat Gogawale : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला संधी मिळेल. त्याचबरोबर रायगडचा पालकमंत्री मीच होणार असल्याचा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांना वेग आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ( Shinde Group MLA Bharat Gogawale Said Aditi Tatkre will not Guardian Minister of Raigad District )

Nepal Helicopter Crash: नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत

काय म्हणाले भरत गोगावले?

अधिवेशनाअगोदर येत्या दोन तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणे आपोक्षित आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माझं नाव चर्चेत आहे कारण पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातच मला संधी मिळणार होती मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे आता मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. म्हणून मी मागच्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी थांबलो होतो. म्हणूनच त्यांनी तेव्हा सामंतांना रायगडच पालकमंत्री पद दिलं होतं तर आता मी मंत्री झालो की, ते मला मिळणार आहे.

टाटांचं मोठं पाऊल! रिलायन्सला मागे टाकत लवकरच करणार ‘हे’ काम

पुढे गोगावले असं देखील म्हणाले की, रायगडचा पालकमंत्री मीच होणार आहे. त्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना राज्यातील कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं. त्यावर आम्ही काहीही म्हणणार नाही. असं देखील गोगावले म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी रात्री झालेल्या शिंदे, पडणवीस आणि पवारांच्या बैठकीवर गोगावले म्हणाले की, आम्हाला या बैठकीबद्दल माहिती नाही नात्र आता आम्ही शिंदेंना याबद्दल विचारणार आहोत. आद्याप मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची शक्यता नाही कारण आम्हाला काही निरोप आलेला नाही. जर मंत्रिमंडळविस्तार असेल तर एक दिवस आधी तरी सांगण्यात येईल असं गोगावलेंनी सांगितलं आहे.

Tags

follow us