टाटांचं मोठं पाऊल! रिलायन्सला मागे टाकत लवकरच करणार ‘हे’ काम

टाटांचं मोठं पाऊल! रिलायन्सला मागे टाकत लवकरच करणार ‘हे’ काम

देशातील आघाडीचा उद्योग समूह टाटा लवकरच अॅपल कंपनीचा कारखाना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीचा करार अंतिम टप्प्यात असून साधारण ऑगस्टमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे स्थानिक कंपनी आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात उतरेल असे पहिल्यांदाच घडणार आहे. देशात आयफोन तयार करणाराही उद्योग समूह बनेल.

विस्ट्रॉन कॉर्प हा कारखाना दक्षिणी कर्नाटकात आहे. या कारखान्याची किंमत जवळपास 600 मिलीयन डॉलर्स आहे. हा करार अत्यंत गोपनीय मानला जात आहे. यामध्ये जवळपास दहा हजार कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. आयफोन निर्मितीत भारतानेही उतरणे तसेच चीनला टाळून अन्य ठिकाणी फोन तयार करणे या कामांनाही वेग येणार आहे. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत विस्ट्रॉनने भारतातून जवळपास 500 मिलीयन डॉलरचे आयफोन निर्यात केले.

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होणार? दिल्लीत खरगे अन् राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक

कोविड लॉकडाऊन, अमेरिका आणि चीन यांच्यात सतत वाढत असलेला तणाव यांमुळे अॅपल कंपनीने चीनला टाळून अन्य ठिकाणे शोधण्यास सुरुवात केली होती. भारत हा त्यासाठीचा एक मोठा पर्याय होता. कंपनीनेही भारतावर लक्ष केंद्रीत केले. आता हा करार चीनला टक्कर देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांत महत्वाचा टप्पा सिद्ध होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना चीनवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच भारतात उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करण्यास मदत मिळेल.

टाटा उद्योग देश विदेशातील नामांकित उद्योग समूह आहे. दीडशे वर्ष जुन्या टाटाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि ई कॉमर्स क्षेत्रात जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्योग समूहासाठी हे नवे क्षेत्र आहेत. तामिळनाडू राज्यात शेकडो एकर परिसरात असणाऱ्या कारखान्यात आधीपासूनच आयफोन चेसिस आणि अन्य उपकरणे तयार केली जात आहेत.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प रद्द, थेट करार तोडला

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube