महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प रद्द, थेट करार तोडला

  • Written By: Published:
Foxconn Breaks Deal With Vedanta

Foxconn breaks deal with Vedanta : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला फॉक्सकॉन-वेदांता कंपनीचा सेमीकंडक्टर निर्मिताचा प्रकल्प पुन्हा रखडला जाण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही कंपन्यामध्ये मतभेद होऊन वेगळ्या होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भात आता फॉक्सकॉनने एक ट्विट केले आहे. वेदांता कंपनीशी त्यांचा आता कोणताही संबंध नाही, असे म्हटले आहे.

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतची पार्टनरशिप तोडली आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांता यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक फॉक्सकॉनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फॉक्सकॉन आता हे नाव काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे जी आता पूर्णपणे वेदांता कंपनी आहे.” मात्र, या दोन्ही कंपन्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Amitabh Bachchan यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची जलसाबाहेर गर्दी, Video Viral

फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता. फॉक्सकॉनने सांगितले की, या कंपनीशी त्यांचा आता कोणताही संबंध नाही. त्यामुळे मूळ नावाबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

फॉक्सकॉनचा भारताच्या सेमीकंडक्टर विकासावर पूर्ण विश्वास आहे. कंपनीने सांगितले की, ‘आम्ही भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देतो आणि भागधारकांच्या गरजा लक्षात घेऊन पार्टनरशिप करू.’ गेल्या आठवड्यात उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीने सांगितले की, हे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास व्यवसाय उपक्रम खरेदी करेल. कंपनी ही खरेदी तिच्या होल्डिंग कंपनीमार्फत करेल, असे सांगितले होते.

Tags

follow us