Sanjay Shirsath Reacts on Badlapur Case : बदलापूरच्या आदर्श शाळेतील दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अखेर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. (Sexually Assaulte ) दरम्यान, आता यावर पालकांसह लोकप्रतिनिधींकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
धक्कादायक! शाळेत चिमुरडीवर अत्याचार; अंगावर काटा आणणारी घटना, पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या प्रकरणातील दोषींनी रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे असं म्हणत कायद्याचा काही इथ उपयोग नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. जर चार वर्षांच्या मुलींवर असा अत्याचार होत असेल तर कधीपर्यंत पोलीस तक्रार, न्यायालय त्याचा निकाल याची वाट पाहायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आता हे असलं बस झालं. या नराधमांना थेट रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आम्ही पुढे असणार
मी हे जबाबदारीने बोलतोय. एक लोकप्रतिनिधी असलो तरी हे सांगतोय की आत हे सगळ काही बस झालं. काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार देण्याचा प्रयत्न केला तर ते चालत नाही. यासाठी सरकार कारवाई करेलच. मात्र, सार्वजनिक पातळीवर यांना चिरडून मारलच पाहिजे. आता कठोर कायदा करण्याची गरज आहे. माझी बहीण, माझी मुलगी, माझी पत्नी यांच्याबद्दल सर्वांना काळजी वाटायला लागली. प्रत्येकाला वाटत माझ्या मुलीवर अत्याचार झालाय. अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे आता यामध्ये कठोर कारवाई करायला पाहिजे. तसंच राजकारण करु नका. अशा घटनांमध्ये आपण सर्व सोबत काम करू. जर असे नराधम भेटले तर सर्वात प्रथम आम्ही खेटणार असंही शिरसाट यावेळी म्हणाले आहेत.
बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासंदर्भात आमदार संजय शिरसाठ यांची संतप्त प्रतिक्रिया !#mlasanjayshirsath #BadlapurCrime #BadlapurSexuallyAssaulteCase pic.twitter.com/tt3oiydLCX
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 20, 2024