लाडक्या बहिणींचा सरकारवर भार,आदिवासी अन् समाजकल्याणचे 7 हजार कोटी वळवले; मंत्री शिरसाट अजितदादांना जाब विचारणार

लाडक्या बहिणींचा सरकारवर भार,आदिवासी अन् समाजकल्याणचे 7 हजार कोटी वळवले; मंत्री शिरसाट अजितदादांना जाब विचारणार

Tribal Social Welfare Funds Divert To Ladki Bahin Yajana : राज्यात लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yajana) नेहमीच वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. आता देखील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) या योजनेमुळे नाराज असल्याचं समोर आलंय. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग 3 आणि आदिवासी विभागाचा चार हजार कोटींचा निधी वळता केल्याचं समोर आलंय. यावरून आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी थेट अजित पवार (Ajit Pawar) यांनाच जाब विचारणार असल्याचे संकेत दिले आहेत.

“जयंत पाटलांचे मन कशातच लागत नाही, त्यांनीच मला सांगितलं”, मुश्रीफांच्या दाव्याने खळबळ!

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर खूपच जास्त भार पडत असल्याचं बोललं जातंय. यामुळे अर्थविभाग वेगवेगळ्या विभांगाचा निधी वळता करून या योजनेसाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न करतंय, अशी चर्चा सुरू आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. यासाठी समाजकल्याण अन् आदिवासी विभागाचा सुमारे सात हजार कोटींचा निधी वळता केलाय.

यासंदर्भातील माहितीनुसार अर्थखात्याने समाजकल्याण विभागाचा 3 हजार कोटी आणि आदिवासी विभागाचा 4 हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केलाय. यामुळे या दोन्ही खात्यांच्या काही योजनांना कात्री लागु शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर दोन्ही खात्यांतून नाराजी व्यक्त केली जातेय. यावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.

भारत अन् बलुचिस्तानला चीनच्या प्रोजेक्टचा धोका; अपहरणकर्त्यांच्या रडारवर होता ‘सीपेक’?

संजय शिरसाट म्हणाले की, नियमानुसार दोन्ही विभागांना निधी देणं बंधनकारक आहे. संविधानात याची तरतूद देखील आहे. परंतु यानंतरही या दोन्ही विभागांचा निधी इतर ठिकाणी वळवण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेसाठी पैसा उभं करणं आवश्यक आहे. परंतु यासाठी दलित अन् आदिवासी समाजासाठी असलेला निधी वगळण्यात आलाय. अर्थसंकल्पवर होणाऱ्या चर्चेत या प्रश्नाच्या उत्तराकडे आमचं लक्ष असेल. त्यावेळी आम्ही अजित पवार यांना निधी का वळवण्यात आला, याचं कारण देखील विचारू, असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube