होळी, धुलिवंदन अन् रंगपंचमीसाठी बाजारपेठ सज्ज! परंतु काळजी घ्या, अन्यथा…

Ahilyanagar Market ready for Rang Panchami Festival : रंगांचा सण होळी (Holi Festival) अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना देशभरातील लोक रंग आणि पिचकार्या खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी (Rang Panchami Festival) सणानिमित्त अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. नैसर्गिक रंग, रंग खेळण्यासाठीची विविध साधने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी आबालवृद्धांपासून युवापिढी सज्ज (Ahilyanagar News) झाली आहे. त्यासाठी खास रंगांची खरेदीही सुरू झाली. बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे, मुखवटे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, गाठया दाखल झाल्या आहेत.
भारत अन् बलुचिस्तानला चीनच्या प्रोजेक्टचा धोका; अपहरणकर्त्यांच्या रडारवर होता ‘सीपेक’?
या साहित्यांची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात होळीचे साहित्य दाखल झाले आहे. विशेषत: पिचकाऱ्या, विविध रंग, मास्क, साहित्यांनी बाजारपेठ बहरू लागली आहे. त्याचबरोबर लहान बालकांना आकर्षित करणाऱ्या पिचकाऱ्या आणि विविध मास्कही दिसू लागले आहेत.
बाजारपेठेत ठिकठिकाणी रंगांची विक्री करणारे दुकाने उभारण्यात आले आहेत. रासायनिक रंगांचे धोके असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारत अन् बलुचिस्तानला चीनच्या प्रोजेक्टचा धोका; अपहरणकर्त्यांच्या रडारवर होता ‘सीपेक’?
रासायनिक रंगाचे दुष्परिणाम
होळी हा रंगांचा सण असतो मात्र हेच रंग खेळत असताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आजकाल बाजारात रासायनिक रंग उपलब्ध असल्याने याचा मोठा दुष्परिणाम शरीरावर होत असल्याचे समोर आले आहे. रासायनिक रंग दीर्घकाळ त्वचेवर राहिल्यास त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ त्वचेवर राहतात. त्वचा अत्यंत नाजूक असते. तिला रासायनिक रंग लागल्याने अॅलर्जी होऊन खाजही सुटते. अॅलर्जी जास्त प्रमाणात असेल, तर मानेवर, हातावर आणि कानावर पुरळ आणि फोड येतात. त्यामुळे या रंगांचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. याऐवजी नैसर्गिक रंग वापरावे.