ठाणे : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ शिंदे गटाने हा ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. साधारणपणे १५ ते २० पदाधिकारी असल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाणे येथील आनंद आश्रमात झालेल्या कार्यक्रमात आज नाशिक आणि मालेगाव येथील उद्धव ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी भगवा झेंडा फडकावत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल भास्कर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा गटकळ, माजी नगरसेविका ॲड. श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक ज्योती देवरे, माजी शिक्षण मंडळ सभापती उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे, उप विभागप्रमुख कुमार पगारे, उप विभागप्रमुख पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम अनिता पाटील,
उपविभाग प्रमुख आशा पाटील, शाखाप्रमुख सीमा पाटील यांचा समावेश आहे.
MVA Vs Shinde Group : महाराष्ट्राच्या राजकारणात संभाजीनगरचे महत्त्व वाढले! – Letsupp
नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.