Download App

एकनाथ शिंदे गावाला अन् त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत…, आदित्य ठाकरेंचा टोला

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दावोस (Davos) दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

  • Written By: Last Updated:

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दावोस (Davos) दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात ऐतिहासिक गुंतवणूक होईल असं म्हणत आहे. त्यांनी 54 MOU केले आहेत. यातील 11 विदेशी कंपन्या आहेत तर 43 कंपन्या भारतल्या आहेत. यामधील 33 कंपन्या या महाराष्ट्रतल्या आहेत. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर केली.

पुढे बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, जर एवढ्या कंपन्या भारतातल्या आहेत तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता. असा टोला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला.

तर यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला आणि त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होते. दावोसमध्ये त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्र्यांनी केले.

Video : कराडला गोत्यात आणणाऱ्या धसांवर गंभीर आरोप; उपोषण करत पीडितेकडून न्यायाची मागणी

नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, त्यांना निमंत्रण होते की नाही? त्यांना सोबत का नेलं नाही? त्यांची नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

follow us