Minor Boys Kidnapped Man Robbed And Killed For Birthday Party : शिर्डीमधून एक धक्कादायक घटना (Shirdi Crime) समोर आलीय. वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी धक्कादायक कृत्य केलंय. सात अल्पवयीन मुलांनी मिळून 42 वर्षीय व्यक्तीचं अपहरण (Kidnapped) केलं. त्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघड (Minor Boys Killed Man) झालाय. या गूढ प्रकरण्याची उकल करण्यात मृत व्यक्तीचा मोबाईल फोन, हा पोलिसांसाठी मोठा पुरावा ठरलाय.
उसाच्या शेतात मृतदेह
आठ जूनपासून कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सखाहरी चत्तर बेपत्ता होते. त्यानंतर नांदुर्खी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात एक मृतदेह सापडला, तो गणेश चत्तर यांचाच असल्याची पुष्टी झाली. त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचं (Birthday Party Celebration) देखील समोर आलं आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली, त्यांनी तांत्रिक तपासाद्वारे मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शोधून काढण्यात आला. त्यानंतर एक मोठा धक्कादायक खुलासा झाला.
मोबाईल विकून वाढदिवसाची पार्टी
एका अल्पवयीन मुलाने मृत व्यक्तीचा मोबाईल साडेचार हजार रुपयांना विकल्याचं समोर आलंय. यात पैशातून अल्पवयीन आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी आरोपींनी हा संतापजनक प्रकार केल्याचं समोर आलंय. गणेश चत्तर पायी जात होते, त्यावेळी आरोपींनी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर काठीने मारहाण करत गळा दाबला. नशेच्या अवस्थेत असलेल्या या मुलांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली.
Ashadhi Wari : यंदा पालखीवर ‘एआय’चं लक्ष, बससेवा आणि रेल्वेचं काय नियोजन? वाचा एका क्लिकवर
नशेच्या अवस्थेत
त्यानंतर त्यांनी मृतदेह शेतात फेकला अन् ते मोबाईल घेवून पसार झाले. मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी सातही आरोपींना ताब्यात घेतलंय. शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण आणि खुनाचा गु्न्हा दाखल करण्यात आलीय. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे. याअगोदर देखील शिर्डीमध्ये झोपलेल्या एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला लुटल्याची आणि तरूणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. परंतु केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी अपहरण करून खून केल्याची घटना देखील आता शिर्डीत घडली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.