Terrorists Killed : मणिपूरमध्ये भारतीय जवानांकडून 30 दहशतवाद्यांना कंठस्नान…

Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू

मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांविरोधात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची मोहिम सुरु होती. ही मोहिम सुरु असतानाच बचावात्मक परिस्थितीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली आहे. सुरक्ष दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 30 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

यासंदर्भात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी माहिती दिली असून ते म्हणाले जवानांच्या बचावात्मक झालेल्या कारवाईदरम्यान, जवानांकडून एकूण 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. ज्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली ते नागरिकांवर शस्त्रे घेऊन हल्ले करत होते.

वडिलांच्या निधनानंतर खासदार धानोरकरांची प्रकृती खालावली; एअर लिफ्टने दिल्लीला हलवले

दहशतवादी एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्निपर गनने गोळीबार करीत होते. गावातील अनेक घरांवर त्यांनी गोळीबार केला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून राज्यात विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असल्याने दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारतीयांंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या गोळीबारात एकूण 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

Tags

follow us