Download App

”विधानसभेत फिरण्यासाठी कुणी बंदी आणू शकत नाही… ; ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा इशारा कुणाला ?

मुंबई : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Budget Session 2023) होत आहे. या दरम्यान शिवसेनेकडून ( Shivsena ) ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला. हा व्हीप पाळला नाही तर दोन आठवड्यांनी कारवाईचा विचार करू असे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगवले ( Bharat Gogavale ) यांनी यावेळी सांगितलं होतं, त्यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू ( Sunil Prabhu ) यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला. (Sunil Prabhu on Whip ) आम्हाला अद्याप आजूनपर्यंत व्हीप मिळाला नाही. त्यांनी न्यायालयात सांगितले आहे की आम्ही व्हीप बजावणार नाही. न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होणार असेही सुनील प्रभू यांनी सांगितलं आहे, न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितलं.

अधिवेशनाला सर्वांनी हजर राहावं हा व्हीप आम्ही काढला आहे. न्यायालयात आम्ही सांगितलं होतं की कारवाई करणार नाही पण व्हीप काढला. आम्ही कारवाई करणार नाही पण सर्वजण तिथे हजर राहायचे आहे असं शिवसेना प्रतोद गोगावले यांनी म्हंटलं होतं. तर दुसरीकडे यावर पलटवार करत असतांना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी त्यांचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही. ५५ आमदारांना त्यांनी व्हीप जाहीर केला असला तरी तो आम्हाला अजून प्राप्त झाला नाही. सुप्रीम कोर्टासमोर त्यांनी सांगितले आहे की व्हीप बजावणार नाही. मग त्यांनी व्हीप जर काढला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, शिवाय उपस्थितीविषयी आमच्या आमदारांना आम्ही बाजावू म्हणत सुनील प्रभू यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच ठाकरे गट आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. यामुळे एकीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे हे अधिवेशन पार पडत आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यावर पहिल्यांदाच अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये १३ विधेयके मांडली जाणार आहे. अनेक मुद्यांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे.

शिवाय नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानंतर हे अधिवेशन सुरू होणार आहे. यामुळे बऱ्याच नवनवीन घडामोडी घडल्यावर हे अधिवेशन होत असतांना शिंदे आणि ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची शाळा सुरु असल्याचे दिसून येत आहे. अधिवेशन सुरू होण्याअगोदरच शिवसेना प्रतोद भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यात आरोप प्रत्यारोप बघायला मिळाली.

Tags

follow us