बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा बॅास मंत्रिमंडळात, राऊतांचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, परळीमध्ये जोपर्यंत या

बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचाबॅास मंत्रिमंडळात, राऊतांचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला

बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचाबॅास मंत्रिमंडळात, राऊतांचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला

Sanjay Raut on Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. (Deshmukh) अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकरणावरू संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

Santosh Deshmukh Murder : तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुडेंविषयी निर्णय घेऊ; बावनकुळेंचं वक्तव्य

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहिल. आज काही पोरा टोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. बघा त्यांचे चेहरे. ही प्यादी आहेत लहान, ही भाडोत्री पोरं आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटले आता. त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत असं म्हणत नाव न घेता संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.

अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपची रोजीरोटी आहे. दगाफटका कोणी केला, गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आणि कोण दगाफटक्याच्या गोष्टी करत आहेत. या देशात जर कोणी दगाफटका, बेईमानीला खतपाणी घातलं असेल तर ते भाजपने आणि खासकरुन नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी घातलं आहे असंही ते म्हणा्ले आहेत.

Exit mobile version