Sanjay Raut on Beed case Fadnavis : बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले, बीड मधील गावात लहान पोरं हातात बंदूक घेत असल्याचे फोटो समोर येत आहे. हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात, (Sanjay Raut) त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
सपना चौधरी, रश्मिका मंदाना अन् प्राजक्ता माळी; सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
तुम्ही काय पेरत आहात जे पेरल ते उगवलं आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही, त्याची माहिती वारंवार पुढे आली आहे. संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही. जर आरोप आहे, त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री दुबळे आहेत , कमजोर आहेत. गृहमंत्री नाकाने कांदा सोलत आहेत अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.