Download App

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिलं होत; शिवसेना नेते संजय राऊतांचा खळबळजनक दावा

सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचे औषध दिलं गेलं, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut Criticizes PM Modi : शिवसेना फुटीवेळी शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिले होतं, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी याआधी ‘मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं आणि जीवं मारण्याचा प्रयत्न झाला असा दावा केला होता. (Sanjay Raut) यानंतर संजय राऊत यांनी असा दावा केला आहे. धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचं औषध दिलं गेलं. नितीन देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न झाला ते हॉस्पिटलमधून परत आले. काही आमदार हे पाच-सहा दिवस विशिष्ट प्रकारच्या गुंगीत होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांनी घेतला होता. आमदारांचं म्हणणं होतं की, आम्हाला खाण्यातून आणि पेयाद्वारे काही तरी दिले जात होते. सात-आठ दिवस आम्हाला काहीच कळलं नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमचेकडे पुरावे नाहीत. पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचं की, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही. ते गुंगीत आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.

आरक्षणाची मर्यादा हटवणार अन् जातीय जनगणना करणारच; राहुल गांधींची मोठी घोषणा

व्होट जिहाद हा प्रकार फेक निगेटिव्ह असून, आरएसएस आणि भाजप सेट करीत आहेत. भाजपच्या दृष्टीने निवडणूक हरल्या की व्होट जिहाद, एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो व्होट जिहाद होत नाही का? या देशांमध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार असून तुम्ही त्यांचा व्होटिंग राईट्स काढला आहे का? इतरांनी मोदींना मतदान केले तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता. मात्र, तुमच्या विरोधात मतदान केले तेव्हा तो व्होट जिहाद झाला का? जे मोदींना मतदान करतात तेच मतदार आहेत बाकीचे नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

आमचे खासदार संजय देशमुख यांना देखील आमंत्रण दिलेलं नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारी कार्यक्रमासाठी मोदी या ठिकाणी येतात ते भाजपचा प्रचार करण्यासाठी येतात का? तुम्ही प्रधानमंत्री संपूर्ण देशाचे आहात एका पक्षाचे नाही. जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा. सगळी यंत्रणा सरकारची वापरायची आणि प्रचार भाजपचा करायचा. निवडणूक आयोगाने या संदर्भात भारतीय जनता पक्षावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

 

follow us