Download App

शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक सुरू; सुरक्षा काढल्याने शिंदेंच्या आमदारांचा उडणार भडका…

शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पण त्यात आत कपात केल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.

  • Written By: Last Updated:

Security Shinde Group Leaders Reduced : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तेत आलेल्या महायुतीत विविध कारणांमुळे वादाच्या ठिणग्या पडताना दिसून येत आहे. सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफुस सुरू असतानाच आता भाजपने शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना देण्यात आलेली सुरक्षा (Security) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाच्या अंकाला तोंड फुटण्याची आणि सुरक्षा काढून घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदार खासदारांचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयंतराव फार विचार करू नका… पक्षप्रवेशांच्या चर्चांवर गडकरी काय म्हणाले?

पक्षफुटीनंतर देण्यात आली होती सुरक्षा

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्ताखाली शिवसेनेच्या 40 आमदार आणि काही खासदारांनी ठाकरेंविरोधात बंड केलं होतं. त्यानंतर शिंदे सेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. यात संतोष बांगर, संजय शिरसाट, सुहास कांदे, तानाजी सावंत, उदय सामंत आदींसह अन्य आमदारांचा समावेश होता. यात उदय सामंत यांच्या वाहनावर पुण्यात हल्ल्या करण्याचाही प्रयत्न झाला होता. तर, तानाजी सावंत यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. शिवाय ठाकरेंविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. त्यामुळे फुटलेल्या आमदार खासदारांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती. या सर्व बाबी लक्षात घेत शिवसेनेच्या आमदार आणि माजी खासदारांसह शिंदेंनी जवळच्या कार्यकर्त्यांनाही सढळ हाताने कडेकोट सुरक्षा प्रदान केली होती. यातील काही आमदारांना वाय तर, काहींना झेड श्रेणीची सुरक्षाही देण्यात आली होती.

आता गडकरी राष्ट्रवादीत येणार असं म्हणू नका, जयंत पाटलांचा पत्रकारांना टोला

सुरक्षेच्या गराड्यात फिरणाऱ्या आमदारांना आता एकच सुरक्षा रक्षक

आमदारांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यात ज्या आमदारा आणि माजी खासदारांना पूर्वीपेक्षा कमी धोका आहे त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार शिंदेंच्या आमदारांसोबत आता केवळ एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे  सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आणि घराबाहेर पोलिसांचा असलेल्या गराड्या राहणाऱ्या आमदारांना आता केवळ एका पोलिसासह फिरावं लागणार असून, गृहखात्याने केवळ शिवसनेच्याच आमदार खासदारांची सुरक्षा कमी केलेली नसून, यात भाजप नेते रविंद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

महायुतीत पुन्हा धुसफूस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार शक्तिप्रदर्शन, घेतला हा मोठा निर्णय

नाराजी नाट्याचा उडणार भडका

उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका करून एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपला साथ दिली. या बंडात शिंदेंना 40 आमदार आणि 12 खासदारांनीदेखील साथ दिली. या मोठ्या बंडानंतर भाजपने फडणवीसांना डावलतं शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करत भाजपनं फडणवीसांना मुख्यमंत्री तरस शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले.

संवादच तोडून टाकायचा का ? शेवटी धनंजय मुंडे हे देखील मंत्री….देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

त्याहीवेळी शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून गृहखात्यासह अन्य काही महत्त्वाच्या खात्यासाठी आग्रह घरला होता. पण भाजपने या मागणीला सपशेल नकार देत महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनचं शिवसेना आणि भाजपमध्ये वादाच्या अंकाला सुरूवात झाली आहे. एवढेच नव्हे तर, खातेवाटपानंतर मंत्रिमंडळात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले तसेच पालकमंत्रीपद आणि निधी वाटप आदी मुद्द्यांवरून भाजप आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेलेले असताच सुरक्षा कमी करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांतील मैत्रीसंबंधांमध्ये आग लावणारा ठरू शकतो.

शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका, आदित्य ठाकरेंनी दिली तंबी

कोणत्या श्रेणीत काय सुरक्षा?

– झेड प्लसमध्ये सुरक्षेत 55 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक पोलिस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात.
– झेड श्रेणी सुरक्षेत 22 कर्मचाऱ्यांची सुरक्षा असते. यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडो आणि एका पोलिस अधिकारी असतो.
– वाय श्रेणीत 11 सैनिकांची सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो.
– एक्स श्रेणीत 5 किंवा 2 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक सशस्त्र पोलीस अधिकारी असतो.

follow us

संबंधित बातम्या