Download App

बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक; वाचा, काय आहे कारण

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे अटक झाली आहे. त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

Kundlik Khade Arrested : बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतरही वातावरण काही शांत झालेलं दिस नाही. (Arrested) नुकती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्यील पंकजा मुंडेंना कशी मदत केली नाही. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे. (Kundlik Khade) या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे. (Beed) मात्र, त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे.

ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत मोठी बातमी : लडाखमध्ये लष्करी सरावादरम्यान भीषण अपघात, नदी पार करताना 5 जवान शहीद

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी 307 चा गुन्हा कुंडलिक खांडे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी आजच बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला होता, त्यानंतर बीड एलसीबीनं त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ऑडिओ व्हायरल प्रकरणी कुंडलिक खांडे चर्चेत आले होते. कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण व्हायरल झाल्यानंतर खाडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परळी पोलीस स्टेशनमध्ये  हागुन्हा दाखल आहे.

प्रकरण काय? ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून मुंडे समर्थक आक्रमक; शिंदेंचे जिल्हाप्रमुख खांडेंचं ऑफिस फोडलं

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत. तसंच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली.

 

Tags

follow us