Shiv Sena Supreme Court Hearing : एकनाथ शिंदेंना धक्का; धनुष्यबाण हातून जाणार?

Shiv Sena Supreme Court Hearing  :  सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अंतिम सुनावणी सुरु असून या प्रकरणात लवकरच निर्णय

Shiv Sena Supreme Court Hearing

Shiv Sena Supreme Court Hearing

Shiv Sena Supreme Court Hearing  :  सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अंतिम सुनावणी सुरु असून या प्रकरणात लवकरच निर्णय होणार असल्याची आता माहिती  समोर आली आहे. या प्रकरणात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी बाजु मांडली. या वेळी त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणामुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या हातातून आता धनुष्यबाण देखील जाणार असल्याची चर्चा सध्या जोराने राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत (CJI Suryakant) , न्यायमूर्ती व्ही. मोहना (V. Mohana) आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची (Joymalya Bagchi) यांच्या खंडापीठा समोर सुरु आहे. सुनावणीदरम्यान राजकीय पक्षाचे विधीमंडळ गटावर नियंत्रण कायम राहते, पक्षाचा वैध निर्णय हा अंतिम मानला पाहिजे असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या संकेतमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाकडून ही याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आली होती.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

सुनावणी दरम्यान युक्तीवाद करताना ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल म्हणाले की, आमदार म्हणजे मूळ पक्ष नव्हे. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. 2019 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली निवडणूक लढली होती त्यामुळे पक्ष फुटीनंतर पक्षाची मूळ ओळख बदली नाही. आमदार म्हणजे पूर्ण पक्ष नव्हे असं यावेळी कपिल सिब्बल म्हणाले.

पुढे बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, गुवाहाटीला गेल्यानंतर आमदारांनी ठराव करत एकनाथ शिंदेंना मुख्य नेता निवडले होते. मात्र हा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीचा अथवा मूळ पक्षाचा अधिकृत ठराव नव्हता. त्यामुळे त्या आधारे नाव आणि चिन्ह त्यांना देणे कायद्याला धरुन नाही. निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाच्या घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकार नाही. केवळ विधीमंडळातील बहुमताच्या आधारे पक्षाची ओळख निश्चित करणे योग्य नाही असं कपिल सिब्बल म्हणाले.

पुणे, सातारासह ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज-

तर दुसरीकडे या प्रकरणात आज (6 ऑगस्ट) रोजी दुपारी दोन वाजता पुन्हा सुनावणी होणार असून आज एकनाथ शिंदे गटाचे वकिल बाजू मांडण्याची शक्यता आहे.

Exit mobile version