Download App

Dasara Melava : फडक्यावरचा हिरवा रंग काढा… मोदी कोण? उद्धव ठाकरे यांचं भाजपला शिवतिर्थावरून ओपन चॅलेंज

दसऱ्यानिमित्त आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला.

Uddhav Thackeray Criticize BJP PM Modi : दसऱ्यानिमित्त आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. मेळाव्याची तयारी जोरात सुरू असतानाच मुंबईत पावसाने थोडा अडथळा निर्माण केला होता, त्यामुळे कार्यक्रम होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु पावसाच्या अडथळ्याला न जुमानता हजारो शिवसैनिक उपस्थित राहिले आणि मेळाव्याला जोरदार उपस्थिती मिळाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना सुरूवातीलाच एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, बाळासाहेबांची शाल पांघरणारा गाढव असे उदाहरण देत टीका केली.

हिरवा रंग काढून दाखवा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला खुलं आव्हान दिलंय की, फडक्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. एका परिषदेला पाकिस्तानमध्ये गेले म्हणून सोनम वांगचूक हे देशद्रोही ठरले. मग गुपचूप पाकिस्तानला जाऊन केक खाणारे मोदी कोण? (PM Modi) असाही सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेत केलाय.

शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही

मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, परंतु उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यासाठी (Shiv Sena) तुमच्याकडे पैसा नाही. महाराष्ट्राचा तुम्हाला सूड घ्यायचा (Dasara Melava On Shivtirtha) आहे. अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलाय. जीएसटी लावून गेली आठ वर्ष तुम्ही देशाला लुटलं आहे. मुंबई महापालिका यांनी गहाण टाकली आहे, असं देखील ठाकरेंनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार का? मग 5 जुलैला काय केलं होतं? जिथे मातृभाषेचा घात होत असेल, तिथे फूट पडू देणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही, परंतु आमच्यावर सक्ती करायची नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

भाजपला इशारा 

हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, तुमच्या टोप्या घातलेल्या फोटोचंं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही, असं ओपन चॅलेंज मोहन भागवत यांचंं नाव घेत उद्धव ठाकरेंनी दिलंय. हिंदुत्वाचं ढोंग अन् देशभक्तीचं सोंग सोडा. भाजपला प्रेमाने सांगतोय, संधींचं सोनं करा. ही संधी खूप मोठी आहे. अशी कोणाला संधी मिळत नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अंधाऱ्या खाईत जायचं नसेल, तर शिवसेनेची मशाल हाती घ्या, असं आवाहन देखील ठाकरेंनी केलंय. तर प्रत्येक चहाच्या टपरीवर बसून चाय पे चर्चा सुरू करा, असं देखील ठाकरेंनी म्हटलंय.

 

follow us