Amol Humbe’s accusations against local leadership : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी महायुतीत अंतर्गत असंतोषाचा स्फोट झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतूनच(Shivsena) आता उघड नाराजीचा आवाज उमटू लागला आहे. उमेदवारी नाकारल्याच्या रागातून शिंदे गटाचे कट्टर समर्थक अमोल हुंबे(Amol Humbe) यांनी थेट नेतृत्वावरच आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मी गुंड आहे… पण हिंदुत्ववादी गुंड आहे अशा शब्दांत अमोल हुंबे यांनी स्थानिक नेत्यांवर थेट हल्ला चढवला. माझ्यावर गुंडाचा शिक्का मारला, म्हणून मला डावलले होय, मी गुंड आहे पण हिंदुत्ववादी गुंड आहे अशा शब्दांत अमोल हुंबे यांनी स्थानिक नेत्यांवर थेट हल्ला चढवला आहे. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांची नावे न घेता त्यांनी गंभीर आरोप करत उमेदवारी नाकारण्यामागे कट असल्याचा इशाराच दिला आहे.
पण त्याच हिंदुत्वामुळे मला पक्षाने स्वीकारले, मग आज त्याच कारणाने मला डावलले का? हुंबे म्हणाले, मी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. हिंदुत्वासाठी जेव्हा जेव्हा आक्रमक भूमिका घेतली, तेव्हा शिंदेसाहेब माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले. मग माझे तिकीट का कापले? एबी फॉर्म मला का मिळाला नाही? याचे उत्तर शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, निरीक्षक देत नाहीत. हिंदुत्वासाठी लढताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले, हे सत्य आहे. पण त्याच हिंदुत्वामुळे मला पक्षाने स्वीकारले, मग आज त्याच कारणाने मला डावलले का? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिंदे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर
लोक म्हणतात, अमोल हुंबे गुंड आहे. होय! मी गुंड आहे हिंदुत्ववादी गुंड आहे. पण आपलेच लोक मला खाली ओढायचा प्रयत्न करत आहेत. जनता मूर्ख नाही, तिला सगळं कळतं, असे म्हणत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर अविश्वास व्यक्त केला. इतक्यावर न थांबता, खरे कोण आणि खोटे कोण, याचे माझ्याकडे पुरावे आहेत. काही व्हिडिओ बाहेर आले, तर मी अपक्ष म्हणूनही हिंदुत्वाच्या बळावर निवडून येऊ शकतो,असा थेट इशाराच अमोल हुंबे यांनी दिल्याने शिंदे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटातील हा असंतोष उघडपणे समोर आल्याने, हिंदुत्वाच्या नावावर सुरू असलेली अंतर्गत लढाई पक्षाला किती महागात पडणार? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
