Download App

Video : अत्याचार करणाऱ्या शिंदेंला गोळी घालणं योग्यच; दिघेंनीही गोळ्या घातल्या असत्या पण…

महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसऱ्या मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महायुती सरकार आणि त्यांच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, शिंदेला गोळी मारणं हे योग्यच होतं त्याचा गुन्हाच तसा होता. आनंद दिघे जरी असते त्यांनी देखील पहिली गोळी शिंदेला घातली असती असे ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray On Badalapur Accused Encounter In Shivaji Park Dasara Melava)

“मला हलक्यात घेऊ नका, याच दाढीवाल्याने आघाडी उद्धवस्त केली”, CM शिंदेंनी थेट ललकारलंच

बदलापूर अत्याचारातील आरोपीच्या एन्काउंटरवर बोलताना ठाकरे म्हणाले की, नराधम शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आनंद दिघे (Anand Dighe) जर असते तर, त्यांनी देखील या पापासाठी शिंदेला गोळी घातलीच असती. महिलांवर अत्याचार करणाऱ्या शिंदेला गोळी घातली ते बरचं झालं. शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये त्याला मारायलाच पाहिजे होता पण, शिंदेला मरल्यानंतर जसं आपल्या मराठीत म्हणतात की, म्हातारी मेली त्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावतोय असे ठाकरे म्हणाले. शिंदेला गोळी घातली कारण या प्रकरणात ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांना वाचवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही शिंदेला गोळी घातली असेल. त्यामुळे या गोष्टीचादेखील उलगडा झाला पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.

2 महिन्यांनी शिवसेनेचा CM असेल, राऊतांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा अन् तुफान फटकेबाजी

चंद्रचूडसाहेब तुम्हाला ऐतिहासिक संधी – ठाकरे

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्याायालयात केस दाखल करण्यात आली आहे. यावर बोलताना ठाकरेंनी सरन्यायाधीशांना उद्देशून आवाहन केले आहे. ते म्हणाले की, चंद्रचूडसाहेब तुम्हाला ऐतिहासिक संधी असून, आम्हाला न्याय देण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे. तीन सरन्यायधीश येऊन गेले तरी, या ऐतिहासिक केसचा निकाल लागू शकलेला नाही.

Video : लाडक्या बहीणींनो 1500 रूपये कचकून घ्या: शिंदे-फडणवीस फक्त पोस्टमन; अंधारे बरसल्या

प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार; ठाकरेंची मोठी घोषणा

आपलं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते म्हणाले की, ते आमचे दैवत असून होय आम्ही आमच्या देवऱ्यातही छ.शिवाजी महाराजांची पूजा करणार. जसे आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार असे ठाकरे म्हणाले. जय शिवराय हा तर माझ्या महाराष्ट्राचा मंत्र असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हात मी छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारीनचं पण, आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभे राहिले पाहिजे. मंदीर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही तर, त्यांच्या आयुष्यातील जे काही प्रसंग आहेत ज्याला पुरावे आहेत हे सगळे प्रसंग त्या मंदीरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्र निमित्ताने किंवा त्यादृष्टीने कोरले जातील किंवा दाखवले जातील.

follow us