राष्ट्रवादीनंतर शिंदेंचा पहिला उमेदवार बिनविरोध; ठाकरेंची माघार, जळगावमध्ये आमदार सोनवणेंचे पुत्र बिनविरोध

Shivsena Candidate भाजप राष्ट्रवादीनंतर आता जळगाव महानगर पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला नगरसेवक झाला आहे.

Shivsena Candidate

Shivsena Candidate

Shivsena Candidate Gaurav Sonavane unopposed in Jalgaon Municiple Corporation : राज्यामध्ये एकीकडे महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असता. अनेक ठिकाणी अनेक पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडुण येत आहेत. कारण आज अर्ज मागे घ्यायला सुरूवात झाल्याने अनेकांना विरोधी उमेदवार न राहिल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजप राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला नगरसेवक झाला आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत दाखल अर्जातील तब्बल 17 अर्ज छाननीत बाद

जळगाव महानगर पालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि तेथील शिंदेंच्याच पक्षाचे आमदार असलेले चंद्रकात सोनवणे यांचे पुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याने ते शिंदेंच्या शिवसेनेचा पहिले नगरसेवक झाले आहेत. याठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने गौरव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अहिल्यानगर भाजपमध्ये धक्कादायक प्रकार, जाहीर झालेली उमेदवारांची यादी परस्पर बदलली? अनेक चर्चांना उधाण

दरम्यान आज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 8 ड मध्ये कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी आजची (ता. १) मोठी घटना घडली आहे.

प्रभाग क्रमांक सात मधील ड सर्वसाधारण

प्रवर्गात फक्त दोन उमेदवार राहिले होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाकळे कुमार बबनराव आणि अपक्ष कोलते मुरलीधर रामा या दोघांचे अर्ज मागे राहिले होते आज सकाळी कोलते मुरलीधर रामा यांनी अर्ज मागे घेतला असून या ठिकाणी फक्त कुमार वाकळे यांचा अर्ज राहिला असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहे. 

Exit mobile version