अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत दाखल अर्जातील तब्बल 17 अर्ज छाननीत बाद

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी इच्छुकांनी मंगळवारअखेर दाखल केलेल्या तब्बल 788 अर्जांपैकी 17 अर्ज छाननीत बाद.

  • Written By: Published:
Untitled Design (187)

As many as 17 applications filed for elections were rejected : अहिल्यानगर(Ahilyanagar) महापालिका निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी इच्छुकांनी मंगळवारअखेर दाखल केलेल्या तब्बल 788 अर्जांपैकी 17 अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले. त्यात एबी फॉर्मवर खाडाखोड, अनुमोदकांच्या सह्या चुकीच्या असणे अशी कारणे नोंदविण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे(Yashwant Dange) यांनी सांगितले.

शिवसेनेला मोठा धक्का

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला(Shivsena) मोठा धक्का बसला आहे. 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले आहे. अर्जांवर काही उमेदवारांच्या अनुमोदकांच्या सह्या चुकीच्या होत्या, तर काही उमेदवारांच्या एबी फॉर्मवर खाडाखोड होती. काहींनी एबी फॉर्मच्या झेरॉक्स जोडल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले.

…म्हणून त्या 16 जागा काँग्रेसला परत केल्या; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. आजपासून उमेदवारी अर्ज माघारीचा पहिला दिवस असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेतात, कोणत्या प्रभागात लढत रंगते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच अहिल्यानगर महापालिकेतील अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.

follow us