Download App

MLA Disqualification : सुनावणी संपली! ठाकरे गटाने दिले पुरावे, शिंदे गटाला 24 नोव्हेंबरची मुदत

MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification) आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच या वकिलांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. व्हीप प्रकरणात ठाकरे गटाच्यावतीने सर्व कागदपत्रे आजच सादर करण्यात आली तर शिंदे गटाला मात्र पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. त्यानंतर सुनावणीच्या कार्यवाहीने वेग घेतला आहे.  त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांना दणका : आमदार अपात्रतेप्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश

तुम्हाला इंग्रजी येते का? प्रभू म्हणाले, मी मराठीत कॉन्फिडंट

आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच त्यांना उलट प्रश्न देखील करण्यात आले. या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली होती मात्र नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. सुनील प्रभू यांनी मराठीतूनच प्रश्न विचारावेत अशी मागणी केली होती त्यानुसार राम जेठमलानी यांना त्यांना प्रश्न विचारले. शपथपत्र इंग्रजी भाषेत का देण्यात आले असा प्रश्न जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना विचारला. त्यावर मी मराठीतच याचिका दाखल केली होती. वकीलांनी इंग्रजीत ड्राफ्ट करून दिला, असे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले. वकील देवदत्त कामत आणि अनिल साखरे यांनी उद्धव ठाकरे गटाच्यावतीने काम पाहिले.

16 नोव्हेंबरपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने सर्व कागदपत्रे जमा करावीत. तुम्ही वेळ का वाढवत आहात. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मला 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 25 डिसेंबरपर्यंत होईल अशी शक्यता दिसत आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अजूनही (Maharashtra Politics) लागलेला नाही. शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification)  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. 31 डिसेंबर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा; आमदार अपात्रतेची सुनावणी

दुसरीकडे, जर नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात सुधारित वेळापत्रक सादर केले,तर त्या वेळापत्रकाप्रमाणे सुनावणी घेवून दोन्ही पक्षांबाबत कार्यवाही करण्याबाबत सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना मार्गदर्शक सूचना देवू शकत. पण जर, नार्वेकरांनी सुधारित वेळापत्रक सादर केलं नाही तर, सुप्रीम कोर्ट हे त्यांच्या पद्धतीने याप्रकरणात हस्तक्षेप करू शकतं. तसेच अध्यक्षांना सुनावणी घेण्याबाबत नवीन वेळापत्रक सुप्रीम कोर्ट देवू शकते. त्या पद्धतीने अध्यक्षांनी कारवाई करणे अपेक्षित असेल.

Tags

follow us