Download App

पूरग्रस्तांसाठी शिंदेंच्या ‘बॉक्सर’ आमदाराचा मोठा निर्णय! संजय गायकवाडांकडून प्लॉट विकून 25 लाखाची मदत

Shivsena MLA Sanjay Gaikwad यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी दोन प्लॉट विकून मिळालेले 25 लाख रुपये हे पूरग्रस्तांसाठी दिले आहेत.

  • Written By: Last Updated:

Shivsena MLA Sanjay Gaikwad Helps for Flood Victims by selling his Worth 25 lakhs plots : राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं अतोनात नुकसान झाले. सरकारकडून मदतीची घोषणा केली गेली आहे. मात्र या दरम्यान राज्यातील विविध स्तरावरून देखील या पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी आणि कृतीसाठी ओळखले जाणारे आमदार संजय गायकवाड यांनी देखील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे

संजय गायकवाड प्लॉट विकून पूरग्रस्तांना मदत…

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच, पिकाच आणि घरांचही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यांनी आपल्या मालकीचे दोन प्लॉट विकून मिळालेले 25 लाख रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. ही मदत डीडीद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली जाणार आहे. सोबतच दानशूर व्यक्तींनी देखील समोर येऊन सढळ हाताने मदत करण्याच आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मिळणार मदत

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. (Rain) या पावसाचा सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. अनेकांचं कधीच भरून न येणार नुकसान झालं आहे. जमीन खरडून गेली आहे. पिकं सडली आहेत. अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.

दिवाळी सणाच्या तोंडावरच नागरिकांच्या खिशाला झळ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय

अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांना मदत होणार आहे. या जिल्ह्यात आता प्रशासनाला मदतीसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

follow us