मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राजकारण आणि खेळात काहीही होऊ शकते. आताच त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण भविष्यात काहीही घडू शकते, असे सूचक विधान करत भरत गोगावले यांनी भविष्यात शिवसेना आणि मनसे यांची युती होऊ शकते, असेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांसह एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्याला जाणार आहेत. त्याची तयारी शिवसेनेकडून सुरू असून त्यांच्या दौऱ्याचे अंतिम नियोजन लवकरच जाहीर करण्यात येईल, असे भरत गोगावले यांनी सांगितले. त्यावेळी भरत गोगावले यांना मनसे बरोबर तुम्ही युती करणार का, असे विचारले असता भरत गोगावले म्हणाले की, राजकारण आणि खेळात काहीही घडू शकते. त्यामुळे आताच त्यावर बोलणे उचित होणार नाही. भविष्यात काहीही होऊ शकते, असे सांगत आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर अयोध्याला जायचे आणि प्रभू श्रीराम यांचे दर्शन घ्यायचे, असे ठरले आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. परंतु, अद्याप निश्चित तारीख आता सांगता येणार नाही. मात्र, ६ ते १० एप्रिल या दरम्यान आम्ही अयोध्याला जाऊ. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार असे सर्वच जण असणार आहेत.
Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार
भरत गोगावले म्हणाले की, अयोध्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. कारण धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर तेव्हाच जायचे ठरले होते. एकनाथ शिंदे जे बोलत होते. ते आता पूर्ण झाले आहे. शिंदे यांनी प्रभू श्रीराम यांच्याकडे काही नवस केला आहे, तो फेडण्यासाठी जाणार आहोत.