Download App

मातोश्री वर खलबतं! ठाकरे गटाच्या वाघीण सुषमा अंधारे लोकसभेत नवनीत राणांशी भिडणार?

Shivsena Leader Sushma Andhare Vs Navneet Rana :  नुकताचं काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला आहे. यामध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा जोरदार पराभव झाला आहे. यानंतर महाविकास आघाडी अलर्ट मोडवर आली आहे. कर्नाटकच्या निकालानंतर तातडीने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होता. यामध्ये आगामी काळातील विविध निवडणुकांवर चर्चा झाली.

यानंतर आता आज ठाकरे गटाची मुंबई येथे मातोश्रीत एक बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील जिल्हाप्रमूख आणि संपर्कप्रमुख हे मातोश्रीत दाखल झाले आहेत. या बैठकीतमध्ये आगामी काळातील निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. 2024 च्या लोकसभेला केवळ 1 वर्ष बाकी असताना ठाकरे गटाच्या या बैठकीली विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

TDM Movie: अखेर भाऊ कऱ्हाडेच्या अश्रुंना मिळणार न्याय; TDM ‘या’ तारखेला होणार नव्याने प्रदर्शित

या बैठकीत आगामी निवडणुकांविषयीची चर्चा झाली आहे. तसेच कोणत्या कोण उमेदवार लढणार याची चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. याच वेळी ठाकरे गटामध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या, ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या उमेदवारीवर देखील चर्चा झाल्याचे कळते आहे. सुषमा अंधारेंना ठाकरे गट नवनीत राणांच्या विरोधात निवडणुक लढवायला उभा करु शकतो, अशी माहिती आहे.

नवनीत राणा व सुषमा अंधारे यांच्यामध्ये कायम शाब्दिक चकमक उडत असते. दोन्ही नेत्या एकमेकांवर भरपूर तोंडसूख घेत असतात. त्यामुळेच ठाकरे गट या अमरावतीच्या जागेवर अंधारेंना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावतीची जागा ही पूर्वापार शिवसेनेकडे आहे. या जागेवर शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ हे अनेकवेळा निवडून आले होते. पण 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला होता.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यानंतर आता आनंदाराव आडसूळ हे शिंदे गटात आले आहेत. तर नवनीत राणा या भाजपच्या जवळ आहेत. त्यामुळे या जागेवर ठाकरे गट सुषमा अंधारेंना संधी देऊ शकतो, असे बोलले जात आहे. यावर अंधारेंना आपले मत विचारले असत त्या म्हणाल्या, अमरावतीची जागा ही राखीव आहे आणि त्या प्रवर्गामध्ये मी बसत नाही त्यामुळे या चर्चा निरर्थक आहे लोकसभा निवडणूक लढण्याबाबत अशी कोणतीही चर्चा झाल्याची माहिती माझ्याकडे नाही असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.

 

 

 

 

 

 

Tags

follow us