Download App

“आम्ही नातं जोडायला सकारात्मक, उद्धव ठाकरेंची..”, शिवसेना-मनसे युतीसाठी संजय राऊतांचे संकेत

पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. पडद्याच्या नाड्या ठाकरे भावांच्या हातात आहेत ते योग्य वेळी पडदा वर करतील.

Sanjay Raut on Raj Thackeray : राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येतात की नाही याची सर्वांनाच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्र हिताचा मुद्दा पुढे करत दुसरी टाळी दिली होती. परंतु, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा हात मागे घेतल्याचं समोर आलं होतं. या घडामोडींत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मोठं वक्तव्य केलं आहे. पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. पडद्याच्या नाड्या ठाकरे भावांच्या हातात आहेत ते योग्य वेळी पडदा वर करतील असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांनी मुलाखत दिली म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असे मी मानत नाही मुलाखतीवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आले की फार गोड बोलतात. पण तसं नाही. आम्ही स्वतः उद्धव ठाकरे शिवसेना हे मनसेसोबत नातं जोडण्याची सकारात्मक भूमिका आम्ही ठेवलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवर जनतेचं प्रेशर आहे. हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा आहे.

मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार कायम ठेवायचा असेल ईस्ट इंडिया कंपनी सूरत अमित शहा, नरेंद्र मोदी त्यांचे इतर बाकी शेअरहोल्डर त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आम्ही चर्चा केली आहे. आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. ही भूमिका आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे असे संजय राऊत यांनी सांगितले.

ब्रेकिंग : राहुल गांधींसमोर उभं राहिलं नवं संकट; मानहानी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी

ईस्ट इंडिया कंपनीचे मालक दिल्लीत बसले आहेत गुजरातमधून गेलेले. मुंबई येथे येणार नाही त्यासाठी आधी ठाकरे आणि पवार यांना संपवा. त्यासाठी पक्ष तोडले, लोकांना तुरुंगात टाकलं, चिन्ह काढून घेतलं ही जी त्यांची भूमिका आहे ईस्ट इंडिया कंपनी सूरत ही त्यासाठीच आहे. पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकरे आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत. या देशातून मोदी, शहा आणि फडणवीस ही नाव फुसली जातील मी तुम्हाला खात्रीने सांगतो असेही राऊत यांनी सांगितले.

follow us