Shocking incident in Palghar : स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने जळणाऱ्या चितेवर पत्रे धरून राहण्याची वेळ मृताच्या कुटुंबियावर ओढवल्याची धक्कादायक घटना पालघर मध्ये समोर आली आहे. 21 व्या शतकात विकसित असणाऱ्या महाराष्ट्रात अशी वेळ येते ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकीकडे मोठं – मोठ्या बिल्डींगी पाहायला मिळतात आणि दुसरीकडे मेलेल्या माणसाच्या चितेवर हाताने पत्रे धरण्याची वेळ येते. म्हणजे माणूस मेल्यावरदेखील त्याच्या नातेवाईकांना संघर्ष करावा लागतो.(Shocking incident in Palghar)
जळणाऱ्या चितेवर पत्रे धरून राहण्याची वेळ, पालघरमधील धक्कादायक घटना #Palghar pic.twitter.com/oIZmqTSOHb
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 6, 2023
पालघर मधील साखरे धोडीपाडा येथे गोविंद वाळू करमोडा या शंभरी पार केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता मात्र स्मशानभूमीवर पत्रेच नसल्याने प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृताच्या कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली.
पावसामुळे जळणाऱ्या चितेवर पत्रे पकडून अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यामुळे जिल्ह्यात मूलभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.