शिंदे-फडणवीस राजभवनाकडे गेले आणि अनेकांना धडकी भरली !
Mahrashtra Political Crisis: राज्यातील राजकारणात आता दररोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गट दाखल झाल्यापासून शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. मंत्रिपद मिळविण्यासाठी शिंदे गटातील आमदार आक्रमक झालेले आहेत. अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमोर ही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातील शिंदे गटातील काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्यास तयार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.मुख्यमंत्री बदलेले जातील, अशी राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. (Eknath Shinde and Devendra Fadnavis went to Raj Bhavan and political gossip)
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अचानक राजभवनात घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक राजभवनात दाखल झाले. मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे शिंदे गटातील अनेकांची धडकी भरली.
भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफांना ईडी कारवाईबाबत मोठा दिलासा…
पण मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळ्याच गोष्टीसाठी राजभवनात आल्याचे समोर आले. राजभवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले होते. त्यामुळे वेगळ्या राजकीय घडामोडी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटामध्ये मोठी नाराजी आहे. बहुमत असताना अजित पवारांना सत्तेत घेण्याची काय गरज होती, असेही शिंदे गटातील आमदार उघडकपणे बोलून दाखवत आहेत.
शिंदेंचं बंड, फडणवीसांची उचलबांगडी अन् आता राष्ट्रवादीला भगदाड; भूकंपांमागील खरा चाणक्य कोण?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्या विदर्भात होत्या. गुरुवारी त्या मुंबईत होत्या. मुंबईतील राजभवनातील कार्यक्रमानंतर त्या सिध्दिविनायकाच्या दर्शनाला गेल्या होत्या. तसेच शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनही त्या जाणार आहेत.