भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफांना ईडी कारवाईबाबत मोठा दिलासा…

भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफांना ईडी कारवाईबाबत मोठा दिलासा…

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)पाठिंबा दिला. अजितदादांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातील कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya)यांच्यासह विविध नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ईडीची धाड देखील पडली होती. आता मात्र मुश्रीफांनी भाजपला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांना दिलासा मिळाला आहे.(NCP Hasan mushrif court relief ed case bjp Support)

NCP : “जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच असायचं; बहुतेक वेळा तर…” : पवारांचा नातू पटेलांना भिडला

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मुश्रीफ यांना तगडं मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता हसन मुश्रीफ यांनी भाजपला पाठिंबा देताच त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.

‘कोणाला काय व्हावं वाटतं याच्याशी मला देणंघेणं नाही’, पवारांनी CM पदावरून अजितदादांना डिवचलं

काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता पुढील सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्यावरील गुन्हा रद्द होणार असल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये सुरु झाल्या आहेत. त्यामुळे भाजपामध्ये गेल्यानंतर सगळे भ्रष्टाचार करणारे नेते स्वच्छ होतात, असं विरोधक म्हणत असतात, त्याच गोष्टी याबाबत होत असताना दिसत असल्याने जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube