‘कोणाला काय व्हावं वाटतं याच्याशी मला देणंघेणं नाही’, पवारांनी CM पदावरून अजितदादांना डिवचलं
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असून आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. यावरूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना टोला लगावला. कोणाला काय व्हावं वाटतं, याचं मला काही देणं-घेणं नाही, असं शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar on ajit pawar over from chief minister post)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावं वाटतं, याविषयी विचारले असता पवार म्हणाले, कोणाला काही व्हावं वाटंत याचं मला काही देणं-घेणं नाही. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी म्हणून स्वत:ची निवड केली.
भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा, पण पंकजा मुंडे आहेत कुठे? PHOTO आले समोर
या संदर्भातील प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचं मी ऐकलं. मात्र, मीच राष्ट्रवादीची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कुणी काय नियुक्त्या केल्या, यात तथ्य नाही. दुसरं कुणी स्वत:च्या नावाने विधान केलं असेल किंवा काही बोललं असेल तर ते बोलू शकताच. मात्र, त्यात सत्यता नाही. मीच अध्यक्ष आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. त्यामुळं निवडणूक आयोगात जाण्याचा आमचा विचार आहे. कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे वेळ आल्यावर कळेल. आम्ही नव्यानं पक्षाला उभारी देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना पवारांनी भाजपवरही निशाणा साधला. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा सत्तधारी पक्षाकडून वापर होत आहे. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की, 2024 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत, त्यांना लोक दूर करतील. विरोधी पक्षांवविरोधात जे काही कट कारस्थानं करण्यात आलं, त्याची किंमत मोजावी लागेल, असं मत पवारांनी व्यक्त केलं.