भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा, पण पंकजा मुंडे आहेत कुठे? PHOTO आले समोर
भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात राजकीय भूकंप घडत असताना पंकजा मुंडे या मागील 4 दिवसांपासून राज्याच्या बाहेर आहे.
4 जुलैपासून पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहे. उजैन्नमध्ये भाजपकडून आयोजित प्रदेश कोर कमिटीच्या बैठकीला त्या हजर होत्या.
त्यानंतर त्यांनी भोपाल येथील सर्वात मोठे शिवलिंग असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
पंकजा मुंडे यांनी विश्व प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन पुजाही केली.
