असल्या लोकांना गोळ्या घाला…, भोंदू खरातबाबच्या प्रकरणावर कालिचरण महाराजाचा वार

भोंदू अशोक खऱातबाबा प्रकरणावर आता कालिचरण महाराजांनीही प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे.

News Photo   2026 03 21T182833.290

असल्या लोकांना गोळ्या घाला..., भोंदू खरातबाबच्या प्रककरणावर कालिचरण महाराजाचा वार

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सारख्या लोकांना (Kharat) भरचौकामध्ये डोक्यात गोळ्या घाला, अशी मागणी कालीचरण महाराज यांनी सरकारकडे केली आहे. ज्या लोकांवर आरोप सिद्ध होत आहेत, अशा लोकांना भर चौकामध्ये सरकारने गोळी मारली पाहिजे. जे असली असते त्याची नक्कल केली जाते. पण जे नकली आहेत ते असली असतील असे नाहीच असे कालीचरण महाराज म्हणाले.

आसाराम बापूबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कालीचरण महाराज यांनी उत्तर दिलं आहे. पण जे कायद्याने दोषी ठरतात त्यांना डोक्यात गोळ्या घातल्या पाहिजेत असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं आहे. कालीचरण महाराज हे धाराशिव जिल्ह्यात कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. राजकीय वरदहस्तामुळे त्याचे काळे कारनामे सुरू होते. अनेक महिलांचे लैंगिक शोषण त्याने केले. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करून, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?, आकडा ऐकून बसेल धक्का…

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याने महिलांसोबतच्या दृषकृत्याचे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. शिर्डीतील एका पीडितेला आणि खरात याला ब्लॅक करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ लीक केला आणि या प्रकरणाचे बिंग फुटले.

याप्रकरणी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणात अटकसत्र आणि चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अजून तक्रारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version